आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ संपन्न

0
आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ संपन्न
मराठा समाजासाठी उभारण्यात येणारे राज्यातील पहिले मराठा भवन पंढरपूरमध्ये साकारण्यात येत असून या मराठा भवनाच्या मंजुरी पासून ते पायाभरणी शुभारंभ पर्यंत आमदार समाधान आवताडे यांनी सरकारची पाठ न सोडता पाठपुरावा केल्यामुळे पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत हा निधी कमी पडत असून आणखी दहा कोटी ची मागणी समाधान आवताडे यांनी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने केली असून त्या निधीची तरतूद ही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

22 नोव्हेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपूर येथे आले असता सकल मराठा समाज पंढरपूर यांच्या वतीनेही देवेंद्र फडणवीस यांना मराठा भवनाचे निवेदन देण्यात आले होते त्याचबरोबर 15 डिसेंबर 2023 रोजी आमदार समाधान आवताडे यांनी रात्री बारा वाजता मराठा भवन व सारथीच्या केंद्र उभारणीची मागणी अधिवेशनामध्ये केली होती. 2 फेब्रुवारी 2024 रोजी गजानन महाराज मठाच्या पाठीमागील जागा मराठा भवनासाठी देण्यात यावी यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला होता त्याच बरोबर पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी ही वेळी वेळी पाठ पुरावा केला त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 27 जून 2024 रोजी मराठा भवनासाठी निधी मंजूर केला असल्याचे घोषित केले त्यानुसार 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठा भवनाचा पायाभरणी शुभारंभ करण्यात आला असून लवकरच हे भवन साकार होणार असल्याने मराठा बांधवांनी आ आवताडेंचे आभार मानले आहेत.
सदर प्रसंगी मर्चंट बँकेचे चेअरमन श्री.नागेश काका भोसले, मा.नगराध्यक्षा सौ साधना ताई भोसले,श्री.दिपक दादा वाडदेकर,श्री.महेश साठे,श्री.महेश डोंगरे,श्री.अमरजीत पाटील, श्री.संतोष कवडे,श्री.अनिकेत देशमुख श्री.शंकर सूरवसे,श्री.भास्कर जगताप,श्री.सुमित शिंदे,श्री.संदीप आबा पाटील,श्री.शरद चव्हाण सर,श्री.बापूसाहेब कदम,आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !