पोलीस किसान 8 हजार रुपये वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी :
स्वेरीज् इंजिनियरिंग कॉलेज पंढरपूर व जैन ईरीगेशन जळगाव व पोलीस किसान सहकारी संस्था आयोजित राज्यस्तरीय पोलीस किसान 8हजार रू वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा राज्यस्तरीय ऊस परिषद मधे पार पडली या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री अमर पाटील चेअरमन धाराशिव शुगर ग्रुप पंढरपूर तर डॉक्टर श्री बी पी रोंगे संस्थापक सचिव कार्यक्रम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या वेळी 8 हजार रुपये वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादक शेतकरी यांना 5 शेतकरी यांना पोलीस किसान ऊस रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर या वेळी आंतरराष्ट्रीय ऊस संशोधक शास्त्रज्ञ प्रा डॉक्टर अमोल पाटील अरण यांनी 8हजार रू वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन स्प्लिट फर्टिगेशन ऊस तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले तर श्री संतोष डांगे रिजनल मैनेजर जैन इरीगेशन यांनी ऊस उत्पादनासाठी जैन ईरीगेशन कडील उपलब्धता सांगितली तर प्रा डॉक्टर प्रशांत पवार सर यांनी 100 टन ऊस उत्पादन साठी ड्रम फवारणी माहिती व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक दाखवले या कार्यशाळेचे सुत्रसंचलन श्री नानासाहेब कदम पोलीस किसान ऊस मार्गदर्शक तरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रा रवी पवार सर श्री राजाभाऊ पाटील चेअरमन व श्री हणुमंतराव माने व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ पोलीस किसान संस्था यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यशाळा साठी कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते