आ. समाधान आवताडे यांना तालिका अध्यक्ष पदाची संधी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

0
आ. समाधान आवताडे यांना तालिका अध्यक्ष पदाची संधी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ..
मंगळवेढा/ प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांचे पावसाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीने मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे पहिल्यांदाच पोटनिवडणुकीमध्ये निवडून गेलेले आमदार समाधान आवताडे यांना स्व. आमदार भारत भालके नंतर तालिका अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात
केलेले काम पाहून  पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 
           विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन  सुरू झाले आहे.विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड केल्याची घोषणा करण्यात आले.                                                                            यामध्ये भाजपकडून दोघांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या एका आमदाराची वर्णी लावण्यात आली आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून आमदार कालिदास कोळंबकर, समाधान आवताडे, शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लहामटे आणि काँग्रेसकडून अमिन पटेल या पाच आमदारांची निवड तालिका अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अवताडे निवडून आले आहेत.पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून त्यांना बढती मिळाली असून विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे. समाधान आवताडे यांच्या अगोदर या मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे, प्रथमच आमदार झालेल्या आवताडे यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष गैरहजर असतील त्यावेळेस विधानसभेच्या सभापती पदाची धुरा तालुका अध्यक्षांना संभाळावी लागते अडीच वर्षाच्या कार्य काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारसंघांमध्ये निधी खेचून आणला आहे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत राज्यभर त्यांच्या कामाचा गाव गाव होत असून पक्षाने कामसू माणसाला तालिका सभागृहात पाठवून त्यांच्या कामाची दखलच घेतली असल्याचे बोलले जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !