महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने बारामती येथे मनसे मेळावा
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ सुनेत्राताई अजित दादा पवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खडकवासला विधानसभा
मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मनसे नेते तथा बारामती लोकसभा समन्वयक दिलीप बापू धोत्रे, मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या उपस्थितीत खडकवासला येथील शौर्य श्री लॉन्स येथे घेण्यात आली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, प्रदेश सरचिटणीस गणेश आप्पा सातपुते, प्रदेश सरचिटणीस रंजीत शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा समन्वयक सुधीर पाटसकर, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर ,पुणे महिला शहराध्यक्ष वनिताताई वागस्कर,संतोष पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.