मोदींना हरवण्यासाठी सोलापुरात मौलवींद्वारे फतवे काढण्याच्या वृत्तीचा निषेध :आ. राम सातपुते
सर्व समाज एकमुखाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी
सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्यायाने भाजपाला हरविण्यासाठी सोलापुरामध्ये मौलवींकडून फतवे निघत आहेत. जिहादी प्रवृत्तींना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता आहे. अशा फतव्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी निषेध केला.
रविवारी आमदार राम सातपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार श्री. सातपुते म्हणाले, सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. येथील मशिदीतून काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबतचे फतवे निघत आहेत. एमआयएमला या फतव्यांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. घराघरांमध्ये उर्दू भाषेतील पत्रके वाटली जात आहेत. याचा मी निषेध करतो.
इथला हिंदू समाज हे सर्व जाणून आहे. या फतव्यांच्या विरोधात समाज जागृत होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचविण्यासाठी सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. सोलापुरात असे निघणारे फतवे म्हणजे भारताच्या संविधानाला काँग्रेसकडून दिले गेलेले खुले आव्हान आहे, असेही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले. अशा फतव्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा मी निषेध करतो, असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले.
सोलापुरात राजकारणासाठी अशाप्रकारे फतवे काढले जात असल्याचे दिसून आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.