जिनतुल इस्लाम मस्जिदमध्ये रोजा इफ्तार पार्टी संपन्न
युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिल्या पवित्र रमजानच्या शुभेच्छा
पंढरपूर दिनांक ५/४/२०२४
पंढरपूर शहरातील जिनतुल इस्लाम मस्जिद जुनी पेठ काशी कापडी गल्ली येथे राजूभाई सातारमेकर, लालाभाई पानकर, तमीमभाई इनामदार यांच्यावतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजा इफ्तार पार्टीला पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणवजी परिचारक हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना प्रणव परिचारक यांनी पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना युवक नेते प्रणव परिचारक म्हणाले की हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य सातत्याने जतन करून ठेवणारा हा पवित्र रमजान महिना आहे. या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने पांडुरंग परिवारातील सर्व युवा तरुण सहकारी मित्राच्या वतीने व पांडुरंग परिवाराच्या वतीने सर्वांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा देतो निश्चितच हा महिना सर्वांसाठी पवित्र आहे. या पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव रोजाच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रार्थना करत अल्लाहच्या चरणी नतमस्तक होतात. मुस्लिम समाजाशी पांडूरंग परिवाराचे स्नेहाचे संबंध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या माध्यमातुन मुस्लिम बांधवांशी प्रेमाचे आपुलकीचे संबंध पांडूरंग परिवार नेहमीच जपत आलेला आहे. आज या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने व रोजा इफ्तार पार्टीच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना मी पांडुरंग परिवाराच्या वतीने व परिचारक कुटुंबीयांच्या वतीने पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशी प्रार्थना करतो व आनेवाला रमजान आपको बहुत सारी खुशिया दे अशी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपणा सर्वांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया यावेळी पंढरपूर मंगळवेढाचे युवक नेते प्रणवजी परिचारक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.
यावेळी समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने युवक नेते प्रणव परिचारक यांचा सत्कार करण्यात आला.
सदर रोजा इफ्तार पार्टीला पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणवजी परीचारक, राजूभाऊ कौलवार, लाला पानकर, विठ्ठल झेंड, रणजित जाधव, सुनील भोसले, युवराज मुचलंबे, विष्णू सुरवसे, मन्सूर भडाळे, हाजी अकबर शेख इब्राहिम बागवान, राजूभाई सतारमेकर,पत्रकार अश्फाक देवळे तांबोळी हाजी रफिक शेख, अरबाज बोहरी, साकीब बागवान, सलीमभाई शेख कबीर देवकुळे अमोल गुरव आदी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते