प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आज सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

0
प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आज सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

लोकसभेचे रणांगण आता तापायला सुरुवात झाली आहे. राज्यात सोलापूर  मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी ठरत असून सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडताना दिसून येत आहेत. दरम्यान, सोमवारी महविकास आघाडीचे सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. 
सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक रंगतदार होताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विरोधकांच्या  पायाखालची वाळू सरकत असल्याचे चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्रातील दिग्गज मंत्र्यांची फौज सोलापूरातील भाजप उमेदवारराच्या प्रचारासाठी मैदानात उतरवली जात आहे. असे असले तरी प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्रही सोलापूर मतदारसंघात दिसून येत आहे. 

दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही जाहीर सभांचा धडका सोलापूर मतदारसंघात सुरू करण्यात आला आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या पाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची देखील जाहीर सभा पार पडणार आहे. ही सभा सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कर्णिक नगर येथील चिल्ड्रन्स गार्डन या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सोलापूर मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहावे , असे आवाहन महाविकास आघाडीचे नेत्यांनी केले आहे.

यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अनिल दासरी, गणेश वानकर यांच्यासह निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !