पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या ‘पेपर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत स्वेरीच्या एमसीए विभागाचे यश ‘डेक्स्टर इनोफेस्ट' मध्ये सादर केले होते पेपर्स
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या संगणकशास्त्र संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डेक्स्टर इनोफेस्ट’ या ‘पेपर प्रेझेंटेशन’ स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमसीए विभागातील ४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. दि.०७ मार्च २०२४ रोजी झालेल्या ‘डेक्स्टर इनोफेस्ट २०२३-२४’ या संशोधनात्मक स्वरूपाच्या स्पर्धेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनपर पेपर सादरीकरण केले होते. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरमध्ये पार पडलेल्या ‘डेक्स्टर इनोफेस्ट २०२३-२४’ या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्वेरीच्या एमसीए विभागातील एकूण १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये एमसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या श्रुती राजेंद्र चव्हाण व धनश्री दत्तात्रय वाडेकर यांनी सादर केलेल्या ‘द राईज ऑफ रिमोट वर्क’ या प्रकल्पाला रोख रु.पंधराशे, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ‘द राईज ऑफ रिमोट वर्क’ या सादरीकरणात ‘वर्क फ्रॉम होम’ कसे वेगाने वाढत आहे हे दाखवून दिले असून ‘वर्क फ्रॉम होम’ चे फायदे व तोटे काय आहेत? याचा आयटी क्षेत्रामध्ये कशाप्रकारे परिणाम झाला? याचे भविष्य काय असेल? याविषयीचे विचार प्रामुख्याने या सादरीकरणातून मांडले होते. थोडासा वेगळा व आवश्यक विषय हाताळल्यामुळे हे सादरीकरण अत्यंत प्रभावी ठरले. तसेच एमसीए च्या प्रथम वर्षातच शिक्षण घेत असलेल्या प्रदीपकुमार विजयकुमार पांचाळ व स्मिता शिवाजी शिंदे यांनी सादर केलेल्या ‘फिटनेस हब एप्लीकेशन’ या सादरीकरणाला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे बक्षीस मिळाले. ‘फिटनेस हब’ हे एक असे एप्लीकेशन आहे की जिथे आपण ‘ऑनलाइन फिटनेस’चे प्रशिक्षण घेऊ शकतो. जिमचे ऑनलाइन व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी या एप्लीकेशनचा वापर केला जाऊ शकतो. या एप्लीकेशन मध्ये त्यांनी चांगल्या आरोग्यासाठी फिटनेस एप्लीकेशनची गरज दाखवली आहे. या चारही विजेत्या स्पर्धकांना बालाजी अमाईन्सचे संचालक राम रेड्डी व विद्यापीठाचे प्रभारी कुलुगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व विभागप्रमुख प्रा. एम. वाय. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठात प्रभावीपणे प्रकल्प सादर करून विजेतेपद मिळविल्यामुळे संस्थेतर्फे चारही विद्यार्थ्यांचा स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रदीपकुमार पांचाळ, स्मिता शिंदे, श्रुती चव्हाण व धनश्री वाडेकर यांचा संस्थेचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.