पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांमुळे सोलापूरकर राहणार महायुतीच्याच पाठीशी
महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विश्वास : दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळावा उत्साहात
सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांमुळे सोलापूरकर महायुतीच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत असा विश्वास भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाइं महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला. दक्षिण सोलापूर विधानसभेचा संवाद मेळावा सोमवारी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्लेदार मंगल कार्यालयात झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, शशिकांत चव्हाण, डॉ. चनगोंडा हविनाळे, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, भाजपा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष राम जाधव, दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी,
आप्पासाहेब पाटील, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, महिला दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष अंबिका पाटील, मळसिद्ध मुगळे, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, आनंद बिराजदार, आप्पासाहेब मोटे, मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव, माजी नगरसेविका संगीता जाधव, महिला मंडळ अध्यक्ष नीलिमा शितोळे, महेश देवकर, डॉ. शिवराज सरतापे, भटके विमुक्त विकास युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, सोमनाथ साठे आदी उपस्थित होते.
आमदार राम सातपुते म्हणाले की निवडणूक देशाची निवडणूक आहे. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेला सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची कन्या अशी निवडणूक होणार आहे. विरोधक सातत्याने 'भाजपच्या खासदारांनी केलेली कामे सांगा' असे आव्हान देत आहेत. सोलापूर शहराला बायपास रस्ता, विडी कामगारांना ३० हजार घरे, ६५ हजार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये, मुद्रा योजनेच्या माध्यमातून अडीच लाख जणांना १ हजार ७०० कोटींचे कर्ज, अडीच लाख जणांना उज्वला गॅस कनेक्शन, ८५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये जलजीवन मिशनची कामे, ४० हजार कोटींची रस्त्यांची कामे, श्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी, सोलापूर विमानतळाला दिलेला ६० कोटी रुपयांचा निधी, समांतर दुहेरी जलवाहिनीसाठी दिलेला ६५० कोटी रुपयांचा निधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला दिलेला १६४ कोटी रुपयांचा निधी अशा शेकडो कामे भाजपाच्या यापूर्वीच्या दोन खासदारांनी केली आहेत. याची मोठी यादी भाजपाकडे आहे. आता काँग्रेसला त्यांनी गेल्या ७५ वर्षातील कामांचा हिशोब द्यावा लागणार आहे. काँग्रेसने केलेल्या भारतीय सैनिकांच्या अपमानाचा, सीएएला केलेल्या विरोधाचा वचपा सोलापूरकर नक्की काढणार आहेत.
सोलापूरची जनता कामगाराच्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे प्रत्येक बूथवर ही निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीला लागावे, असे आवाहन याप्रसंगी महायुतीचे आमदार राम सातपुते यांनी केले.
हणमंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर शिवराज सरतापे यांनी आभार प्रदर्शन केले.