BRS चे नेते माणिकराव कदम(प्रदेशाध्यक्ष किसान सेल)यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल राज्यप्रमुख पदी माणिकराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, आमदार प्रकाश सोळंके, कोष्याध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सह कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.