स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘इंडियाज टीचडे: चिप्स फॉर विकसित भारत’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ

0
स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘इंडियाज टीचडे: चिप्स फॉर विकसित भारत’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ

अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये केले होते थेट प्रक्षेपणाचे आयोजन

पंढरपूर- आज बुधवार (दि.१३ मार्च २०२४) रोजी सकाळी १०:३० ते दु. ०१:०० च्या दरम्यान भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘देशात ३ ठिकाणी ‘सेमीकंडक्टर फॅसेलिटी’ निर्माण करण्याकरिता आयोजित कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ स्वेरीतील विद्यार्थ्यांनी घेतला. भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातील उच्चतर शिक्षा विभागचे सचिव संजय मूर्ती यांच्या पत्रानुसार व महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या सूचनेनुसार ‘सेमीकंडक्टर मिशन’ व ‘सेमीकंडक्टर फॅसेलिटी’चे बळकटीकरण करण्याकरिता आयोजिलेल्या या  कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन स्वेरी मध्ये करण्यात आले होते. या निमित्ताने स्वेरीतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार वर्गात बसून तन्मयतेने ऐकले व या उपक्रमाचे स्वागत केले. स्वेरी या शिक्षण संस्थेतील चारही महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी या संपूर्ण  कार्यक्रमाचा लाभ घेतला. 
           स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) व डी.फार्मसीमध्ये एल.सी.डी. प्रोजेक्टर द्वारे ‘इंडियाज टीचडे: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले गेले होते. प्रारंभी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांनी विभागप्रमुखांना व वर्ग शिक्षकांना या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. प्रत्येक वर्गात आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल मध्ये थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वांना संबोधित केले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘हा ऐतिहासिक प्रसंग भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे कारण गुजरातमधील धोलेरा आणि सदानंद आणि आसाममधील मोरेगाव येथे तीन मोठ्या ‘सेमीकंडक्टर उत्पादन’ प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. या अनोख्या कार्यक्रमाशी जवळपास ६० हजार हून अधिक महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था जोडल्या गेल्या आहेत.’ असे सांगून भारतीय युवकांना प्रोत्साहित केले. भारत विकसित होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जवळपास अर्धा तासाच्या कालावधीत महत्वपूर्ण विचार मांडले. स्वेरी संचलित अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला व महत्वाचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत नोंद करून घेतले. या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाला स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ व डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, वर्ग शिक्षक, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अभियांत्रिकी व फार्मसीचे पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका मधील विद्यार्थी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !