‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

0
‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 

स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीए व एमसीए सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेस आणखी एकदा मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एमबीए व एमसीए  सीईटी- २०२४ या दोन्ही  प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते सोमवार, दि.१२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए-सीईटी २०२४ व एमएएच एमसीए-सीईटी २०२४ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए व एमसीए विभागात उपलब्ध करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
         पदव्युत्तर पदवी असलेल्या एमबीएच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी एमएएच-एमबीए-सीईटी २०२४ ही परीक्षा शासनाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार साधारण ९/१० मार्च या दोन दिवशी होणार आहे. तर एमएएच-एमसीए-सीईटी २०२४ ही परीक्षा साधारण दि.१४ मार्च २०२४ च्या दरम्यान होणार आहे. एकूणच एमबीए व एमसीएच्या या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते मंगळवार, दि.०६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार होती परंतु विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी या एमबीए व एमसीएच्या –सीईटी पासून वंचित राहू नये यासाठी या प्रक्रियेला अजून एकदा मुदतवाढ देण्यात आली  आहे. आता एमबीए व एमसीए या दोन्ही पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी सोमवार, दि.१२ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी शासनाच्या https://mbacet2023.mahacet.org या संकेत स्थळावर तसेच स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व एमसीएचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख (९०२८९०७३६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !