25 फेब्रुवारी ला सोलापूरात विराट महासंपर्क ब्राह्मण मेळावा
पंढरपूर : अमोल कुलकर्णी
सोलापूरसह लगत जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाचा भव्य महासंपर्क मेळावा दिनांक 25 फेब्रुवारी रोजी शिवस्मारक येथे होणार असल्याची माहिती प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण शिरसीकर यांनी दिली. राज्यातील सर्वात मोठे संघटन असणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून हा विराट महासंपर्क मेळावा आयोजित केला आहे.यामध्ये तरुण,महिला आणि जेष्ठ नागरिक यांचा सहभाग राहणार आहे.समाजाची आताची स्थिती,ध्येय,उद्योग, भविष्य दिशा यावर सर्व समावेशक चर्चा व मार्गदर्शन कुटुंब प्रमुख आंनद दवे व त्यांचे सहकारी करणार आहेत.या कार्यक्रमाचे नियोजन बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल कुलकर्णी, कीर्ती देशपांडेसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक देशपांडे, प्रांजली हिंगे ,श्रद्धा अध्यापक,प्रेमलता वैद्य, दिनकर सापनाईकर, परिणीता कुलकर्णी, अमोल कुलकर्णी,विलास कुलकर्णी
आरती फडके, पौर्णिमा कुलकर्णी, उर्मिला जहागीरदार आदि परिश्रम घेत आहेत.यावेळी सोलापुर जिल्हा व बार्शी तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. तरी सर्व ब्राम्हण समाजाने ठीक १२ ते ३ वाजता या वेळेत कार्यक्रमास उपस्थिती लावावी असे आवाहन ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रविण शिरसीकर यांनी केले आहे.