जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना पेन्शन फायटर यांचे साकडे

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना पेन्शन फायटर यांचे साकडे
  
 आज दिनांक ७ मे २०२३ रोजी जुनी पेन्शन संघटना पंढरपूर द्वारे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब सोबत सात आमदारांना निवेदन देण्यात आले आणि मागणी करण्यात आली. 
श्री रियाज मुलाणी  तालुकाध्यक्ष यांनी जुनी पेन्शन लढ्यासाठी पंढरपूर मधील सर्व विभागांना जोडले आहे. 

श्री वितेश खांडेकर राज्याध्यक्ष आणि श्री रामराव शिंदे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार पंढरपूर मध्ये जुनी पेन्शन संघटनेची वाटचाल पेन्शन मिळवण्यासाठी सुरु आहे.
  
 आजच्या भेटीदरम्यान भेटलेल्या सर्व आमदार ,खासदार यांना असे सांगण्यात आले की, जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्यांना येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील १८ लाख कर्मचारी परिवार , नातेवाईक, मित्रांसोबत मतदान करणार आहोत.
  
 मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यात आली की आपल्या पक्षाच्या जाहिरनाम्यात जुनी पेन्शन लागू करण्याबाबत विषय घेण्यात यावा.
  
 आजच्या कामकाजामध्ये श्री. शरद बिरादार मिडिया प्रमुख, श्री. मयुर कोळी , कृषी विभाग तालुकाध्यक्ष, आरोग्य विभागातून  श्री. धनाजी मस्के , श्री. माने ए.टी., श्री. बगले , श्री. इंगळे, यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली . सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ऊन्हामध्ये उभा राहून जुनी पेन्शनचा संदेश पोहचवण्याची कामगीरी केली. जुनी पेन्शन मिळावी यासाठी आपण सोसलेल्या कष्टाला सलाम.
  
 मित्रांनो, आपला पेन्शन लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे. येणाऱ्या ३०० दिवसांत आपल्या सर्वांना मोठा लढा उभा करावा लागणार आहे. जुनी पेन्शन नक्कीच मिळणार आहे आणि मिळपर्यंत आपण संघर्ष चालुच ठेवणार आहोत. पंढरपूर तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचारी आणि शिक्षक पेन्शन फायटर बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की पेन्शच्या या महायुद्धामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि या संघर्षाचे साक्षीदार व्हावे.
  
 एकच मिशन जुनी पेन्शन
  
 आपलेच पेन्शन फायटर
 श्री रियाज मुलाणी तालुकाध्यक्ष 
 श्री प्रकाश तोटेवाड सरचिटणीस
 श्री अविनाश बुरांडे कार्याध्यक्ष
 श्री विकास बडे कोषाध्यक्ष
 श्री देवानंद चव्हाण प्रसिद्धीप्रमुख
 श्री सुरेश इंगोले ग्रामसेवक तालुकाध्यक्ष
 श्री प्रशांत कुंभार ग्रामसेवक सरचिटणीस
 श्री मयुर कोळी कृषी तालुकाध्यक्ष
 श्री राहूल दडस कृषी सरचिटणीस
  
 महिला आघाडी
 श्रीमती वनिताताई बंगाळे तालुकाध्यक्षा
 श्रीमती अमरजाताई काळे सरचिटणीस
 श्रीमती चंद्रकलाताई कदम कार्याध्यक्षा
 श्रीमती राणीताई शंकर कोषाध्यक्षा
 श्रीमती सरिताताई लोंढे उपाध्यक्षा
 शरीमती सुनंदाताई बडेकर ग्रामसेवक तालुकाध्यक्षा
 श्रीमती स्वातीताई गवळी कृषी तालुकाध्यक्षा
  
 महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना पंढरपूर

Post a Comment

Previous Post Next Post