आँल इंडिया पँथर सेनेची पंढरपूर येथे कार्यकारणी जाहीर
आँल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाई केदार यांच्या उपस्थितीत, पंढरपूर रायगड भवन.उपजिल्हा रुग्णालय शेजारी भव्य असा सत्कार व.कार्यकारणी कार्यक्रम घेण्यात आला,यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाई केदार यांनी प्रथम भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून आपल्या भाषणास सुरुवात केली, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषण शैलीत अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार करणाराचे वाभाडे काढले,व अनेकांना सडेतोड उत्तर दिले,
या आक्रमक भाषणामुळे अनेक युवक वर्ग व महिला वर्ग आँल इंडिया पँथर सेनेकडे आकर्षक झाला,राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाई केदार यांचे पंढरपूर नगरीच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले,तसेच या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाई केदार व सोलापूर जिल्हा कमिटी ,तसेच पंढरपूर तालुक्यातील मान्यवर यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे कार्यकारणी करण्यात आली,सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अमर कांबळे,महिला जिल्हा अध्यक्षापदी शोभाताई ससाणे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी सोनु तात्या माने,,महिला कार्याध्यक्षापदी सोनाताई कटकधोंड, सोलापूर जिल्हा सोशल संघटक सचिव पदी अनिल आगवणे , सोलापूर शहर अध्यक्ष पदी तानाजी शिवशरण महिला सोलापूर शहराध्यक्षा पदी गौरी चन्नुरे ,पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी सुनिल खिलारे,उपाध्यक्ष पदी दिगंबर वाघमारे,पंढरपूर शहराध्यक्ष संतोष धनवजीर, उपाध्यक्ष नंदकुमार लोखंडे, मार्गदर्शक चंद्रकांत साबळे.कार्याध्यक्ष, विठ्ठल साळुंखे, सरचिटणीस सागर कुंदर,खजिनदार, चिंतामणी साळुंखे, महिला शहराध्यक्षा पुजा नेहतराव,कार्याध्यक्षा -शिल्पा बनसोडे मार्गदर्शक मिराताई कुडके,तसेच आदी पदाधिकारी यांची कार्यकारणी करून राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाई केदार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सन्मान करण्यात आले,यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा महासचिव महेंद्र शिरसट ,सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल भाऊ भोसले,जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ शिरसट ,मोहोळ तालुका अध्यक्ष राजन शिरसट ,मंगळेढा महिला तालुका अध्यक्षा कसबे पंढरपूर तालुकाअध्यक्षा बबिता शिंदे, ,मोहोळ महिला शहराध्यक्षा धोत्रे मँडम,तसेच पंढरपूर शहरातील जेष्ठ समाजसेवक भारत माने युवा उद्योजक लखन माने,पै शिवदत्त नेहतराव, मंगळवेढ्याचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर कसबे,तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर व भिमसैनिक उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोलापूर जिल्हा महासचिव महेंद्र शिरसट यांनी केले व आभार व्यक्त करमाळ्याचे धाडशी नेतृत्व सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुनील भाऊ भोसले यांनी केले,
Tags
पंढरपूर घडामोडी