महाडचा सत्याग्रह हा मानवमुक्तीचा लढा होता - डी. के. साखरे

Maharastra now 24
0
महाडचा सत्याग्रह हा मानवमुक्तीचा  लढा होता - डी. के. साखरे 

प्रतिनिधी : प्रकाश इंगोले

मंगळवेढा -: 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या पाण्यासाठी केलेला सत्याग्रह हा समतेचा व मानवमुक्तीचा लढा होता. असे प्रतिपादन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे यांनी केले. महाड सत्याग्रह दिनानिमित्त मंगळवेढा येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
                 पुढे बोलताना साखरे म्हणाले की; पाणी हा मानवाचा निसर्गदत्त हक्क असून चवदार तळ्याचे पाणी कुत्री,मांजरे, डुकरे आदिसारख्या जनावरांना पिता येत होते परंतु हाडा मांसानी बनलेल्या माणसासारख्या माणसांना अस्पृश्यांना ते पिता येत नव्हते. डॉ. बाबासाहेब म्हणाले की; चवदार तळ्याचे पाणी पिले नसल्यामुळे आम्ही मेलो नाही किंवा पिल्यामुळे तुम्ही-आम्ही अमर ही होणार नाही .पण आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी हा सत्याग्रह आहे. आज या सत्याग्रहाला 96 वर्षे उलटून गेली तरीही जातीवाद नष्ट झालेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रस्थापित व्यवस्थेकडून टार्गेट केले जात असून तामम समाजबांधवांनी या विरुद्ध एकत्रित येऊन लढणे ही काळाची गरज आहे. 
यावेळी भारतमुक्ती मोर्चाचे अँड. सीताराम सोनवले, ह. भ. प.सुदर्शन महाराज खडकीकर, पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष समाधान कांबळे, जिल्हा सरचिटणीस श्रीमंत आठवले, मोहोळ तालुका अध्यक्ष उत्तम गायकवाड, भालचंद्र कापसे, आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)