8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर येथे वीरशैव धर्म प्रबोधन परीक्षेचे बक्षीस वितरणाचे आयोजन

8 मार्च जागतिक महिला  दिनानिमित्त पंढरपूर येथे वीरशैव धर्म प्रबोधन परीक्षेचे बक्षीस वितरणाचे आयोजन

 प्रतिनिधी प्रकाश इंगोले

पंढरपूर येथील आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्यावतीने 26 फेब्रुवारी रोजी आपटे उपलप प्रशाला पंढरपूर येथे परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते
आद्य वीरशैव महिला मंडळ च्या अध्यक्षा डॉक्टर सौ शोभा ताई कराळे मॅडम यांनी या परीक्षे संदर्भात बोलताना म्हणाले की समाजातील महिलांना आपल्या धर्माविषयी माहिती व जागृती व्हावी हा उद्देश ठेवून वीरशैव धर्मातील संत, अभंग, शिवचरणी, ग्रंथ, वचन व तत्वज्ञान याविषयी माहिती पुस्तिका  पंधरा दिवसापूर्वी  सौ कराळे मॅडमनी सर्वांना छोटीशी माहिती पुस्तिका दिलेली होती या पुस्तिकेच्या आधारावरून  एक पन्नास मार्काची परीक्षा लेखी स्वरूपात परीक्षा घेतली गेली यामध्ये दहा वर्षाच्या मुली पासून सत्तर वर्षाच्या महिलांपर्यंत जवळजवळ दीडशे महिलांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता बऱ्याच वर्षांनी जेष्ठ महिलांना शाळेतील विद्यार्थी सारखे पुस्तिका व  गुगल व युट्युबचा आधार घेऊन अभ्यास करून लेखी स्वरूपात परीक्षा दिली गेली
या परीक्षेसंदर्भात महिलांमध्ये उत्साही व आनंदाचे वातावरण होते महिलांनी उत्सुकता पूर्णपणे सहभागी होऊन परीक्षा दिली गेली
या परीक्षेमध्ये एकूण पाच नंबर काढण्यात आले
त्यामध्ये प्रथम क्रमांक सौआदिती अमित डोंबे द्वितीय क्रमांक सौ योगिता योगेश गोरे तृतीय क्रमांक सौ अश्विनी आनंद भिंगे चतुर्थ क्रमांक सुलोचना सिद्धेश्वर कोरे पाचवा क्रमांक  सौ सृष्टी रणजीत स्वामी
या मधे  प्रथम , द्वितीय व तृतीय तीन क्रमांकांना मोबाईल व चतुर्थआणि पाच क्रमांक यांना स्मार्ट वॉच शिवशक्ती मोबाईल शॉपी श्री सुभाष खटावकर यांच्यामार्फत देण्यात आले तसेच संबंधित माहिती पुस्तिकेसाठी व परीक्षा केंद्रासाठी विजेत्यांना ट्रॉफी देऊन श्री सिद्धेश्वर कोरे सर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच पंढरपूर येथील प्रसिद्ध नकाते डेअरी यांच्यामार्फत सर्व महिला व पाहुण्यांना चहा व बिस्किटे यांची सोय करण्यात आली
सदर कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून पंढरपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ आशालता कारंडे मॅडम व प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष मामा खटावकर श्री सिद्धेश्वर कोरे सर श्री नकाते हे उपस्थित होते
सदर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाच्या उपाध्यक्ष सौ विशालक्षी पावले, सौ संजीवनी ठिगळे, व सर्व पदाधिकारी अनुराधा स्वामी ,सौ सुनीता राहीरकर सौ
 महानंदा भिंगे ,सौ कविता पावले,सौ आरती पावले सौआदिती डोंबे, सौ स्नेहल म्हमाणे ,सौ सुवर्णा स्वामी ,सौ निर्मला भिंगे ,सौ माधुरी भिंगे आधी महिलांनी परिश्रम घेतले

Post a Comment

Previous Post Next Post