वाखरी येथे मा.श्री.नागेश दादा फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हाफपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचा शुभारंभ संपन्न..
आज दि.८ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह . साखर कारखाना संचालक मा श्री . नागेश दादा फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हाफपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांची सुरूवात मा.श्री.नागेश दादा फाटे,सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.कारखाना संचालक मा.श्री.इब्राईम मुजावर,वाखरी गावचे मा.उपसरपंच श्री.ज्योतिराम मोरे,मा.उपसरपंच श्री.संग्राम गायकवाड,ग्रा.प.सदस्य श्री.चंद्रकांत चव्हाण,मा.सरपंच श्री.नवनार मदने, वस्ताद पै.श्री.औंदुबर शिंदे,ग्रा.प.सदस्य श्री.संजय आप्पा अभंगराव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी *नागेश दादांनी श्री.नागेश गेळे* यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल विशेष आभार मानले.
क्रिकेट स्पर्धा म्हणजे नवयुवकांना एक खास मेजवानीच असते.येवढ्या मोठ्या संख्येने संघाची उपस्थिती म्हणजे युवकांना क्रिकेटची आवड आपल्याला बघायला मिळते.याही पुढे आपण वाखरी गावासाठी साठी मी कुठल्याही कामांसाठी सदैव कटिबध्द आहे व या स्पर्धेसाठी ज्यांनी बक्षिसांचे आयोजन केले ते श्री.सुरज भैय्या मुजावर,श्री.विक्रम भैय्या अभंगराव,श्री.कुमार राजेंद्र बागल,श्री.शिवराज रविंद्र बागल,श्री.दिपक राजाभाऊ कोटावळे,श्री.गणेश दादा मेटकरी,श्री.सौरभ सचिन पवार सह कामेंट्री मॅन एन.पी.सर यांचे विशेष आभार मानले .
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेश सचिव श्री.कल्याण कुसुमडे, उद्योजक श्री.संजय पवार सह वाखरी ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी युवक उपस्थित होते.