श्री नृसिंह विद्यालय पाकणी येथे विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार संपन्न
सोलापुर जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले
श्री.नृसिंह विद्यालय पाकणी प्रशालेत आज शनिवार दिनांक ०७/०१/२०२३ रोजी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक कु.राधा बाळकृष्ण डफळे,पालक ह.भ.प.श्री.बाळकृष्ण डफळे, शालेय शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य व नूतन लोकनियुक्त सरपंच श्री.बालाजी येलगुंडे, नूतन उपसरपंच श्री.विजय शिंदे यांचा प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
तसेच शालेय समितीचे अध्यक्ष श्री.मधुकरआप्पा साठे, शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य श्री.प्रमोद माने,सौ.अंजलीढेंगळे,सौ.चंदना बेलभंडारे ,कु.दिक्षा वाघमारे व समर्थराज शिंदे यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष निवड सूचना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जोडबोटे सर यांनी मांडली तर श्री.घोडके सर यांनी अनुमोदन दिले.या वेळी ह.भ.प.श्री.बाळकृष्ण डफळे महाराज यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कोकरे सर यांनी केले तर आभार श्री कसबे सर यांनी मानले.कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींना गोड खाऊ देण्यातआला.यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.