पंढरपूर येथे महसूल कर्मचारी अँटी करप्शन च्या जाळ्यात.

0
पंढरपूर येथे महसूल कर्मचारी अँटी करप्शन च्या जाळ्यात.

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील तहसील कार्यालयात सर्कल अधिकारी रणजित मोरे एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हाथ सापडला.
आरोपी लोकसेवक रणजीत मारुती मोरे, वय 37 वर्षे, पद- मंडळ अधिकारी,  तहसिल कार्यालय पंढरपूर, रा.पंढरपूर 2) खाजगी इसम शरद रामचंद्र मोरे वय 37 वर्षे, रा. मुंढेवाडी ता.पंढरपूर यांना दि. 20/ जानेवारी 2023 रोजी लाचेची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले.यातील
       हकीकत अशी तक्रारदार यांचे भाडे तत्त्वावर घेतलेला जेसीबी  यातील आलोसे व खाजगी इसम यांनी दि 15.जानेवारी रोजी  ताब्यात घेवून तक्रारदार यांचे टीपर मधून चोरीच्या मुरूमची  वाहतूक झाली असल्याबाबत सांगुन तक्रारदार यांचेवर कोणताही गुन्हा दाखल न करणेसाठी अथवा कोणताही दंड न आकारता ताब्यात असलेला जेसीबी सोडण्यासाठी 1,00,000 / रूपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करून सदर लाच रक्कम 
स्वीकारली असता नमूद आरोपींना  रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
श्री. उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर.
पोलीस अंमलदार -पोह/ शिरीषकुमार सोनवणे, पोना/ अतुल घाडगे , पोना/ प्रमोद पकाले, पोशि/ स्वप्नील संनके, पोशि/ शाम सुरवसे सर्व नेम- अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर मार्गदर्शन अधिकारी :- श्री अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि,पुणे परिक्षेत्र पुणे.श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. पर्यवेक्षण   अधिकारी - श्री.गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर. आदी अधिकाऱ्यांनी सदर कारवाई केली. यामुळे पंढरपूर विभागात खळबळ उडाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !