आक्रमक भूमिके शिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत
यशवंत पवार यांचे प्रतिपादन
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकरिता विमा योजना स्वतः च्या मालकीची पक्की व हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृतपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती खंडणी व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून राज्यातील ज्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नेमणे राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील सर्वच युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत इत्यादी पत्रकारांच्या जिव्हाळ्या च्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन करत असून राज्यसरकार ला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही का? असा उपरोधक व खोचक टोला प्रश्न पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यसरकार ला विचारला असून पत्रकार सुरक्षा समिती ने आजपर्यंत दिलेल्या निवेदनाची राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घ्यावेत अशी मागणी देखील लावून धरली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील व गंभीर होत असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी देखील केली असून आता राज्य सरकार ने राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत गंभीर होण्याची गरज असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत आपण वारंवार आक्रमक भूमिका बजावली असून पत्रकारांच्या जटील व गंभीर प्रश्नावर यापुढे देखील अशीच आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत पत्रकारांच्या प्रश्नाबाबत तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत मा मुख्यमंत्री महोदय यांनी जातीने लक्ष घालून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न लवकरच सोडवावे अशी विनंती देखील केली असून असून मुख्यमंत्री महोदय राज्यातील सर्वच पत्रकारांचे प्रश्न सोडवतील अशी आशा व्यक्त करून राज्यातील पत्रकारांच्या गंभीर प्रश्ना बाबत आपण तडजोड करणार नसल्याची परखड मत व्यक्त करून पत्रकारांच्या प्रश्नावर आपण नेहमीच आक्रमक पणे लढा देतोय आणी राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ही बाब राज्यातील पत्रकारांना माहित आहे तरी मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील पत्रकारांच्या विषयी गांभीर्याने दखल घ्यावी अशी आग्रही मागणी केली असून राज्यातील पत्रकारांच्या विषयी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आपणास नवीन नसून जर राज्य सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नसेल तर पत्रकारांच्या प्रश्नाव पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आक्रमक पणे आंदोलन करणार असल्याची माहिती
पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे