Samruddhi highway toll rates; समृद्धी हायवेवरील टोलचे दर निश्चित करण्यात आलेत
नागपूर : समृद्धी हायवे आता सुरु झालाय. या हायवेवरुन प्रवास करायचं स्वप्न मनात बाळगून असाल तर तुमचा खिसाही जड असायला हवा. समृद्धी हायवेवरील टोलचे दर निश्चित करण्यात आलेत. नागपूर ते शिर्डी या खुल्या झालेल्या मार्गावर एका बसला ३ हजार ४२ रुपयांचा टोल द्याला लागतोय. तुम्ही तुमच्या गाडीतून जाणार असाल तर जाणून घ्या किती टोल द्यावा लागणार ते
समृद्धी महामार्गावर टोलच्या दरांची निश्चित
रस्त्यावर प्रति किमी दरानुसार टोल आकारणी
⇒ समृद्धीचा पहिला टप्पा नागपूर-शिर्डी ५२० किमी
⇒ मोटार, जीपला पहिल्या टप्प्यासाठी ९०० रुपयांचा टोल
⇒ बस, ट्रकसाठी होते आहे ३,०४२ रुपयांची टोल आकारणी
मोठ्या थाटामाटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टचं म्हणजेच समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर आता समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झालाय.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सारखंच या रस्त्यावरुन ड्रायव्हिंग करायचं आणि प्रवास करायचंही अनेकांचं स्वप्न आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सध्या वाहतुकीसाठी खुला झालाय. या रस्त्यावर अनेक टोल आहेत आणि एकूण टोल आकारणी सामान्यांच्या खिशाला चांगलीच फोडणी देणारी ठरणारी आहे. विशेष म्हणजे या मार्गावर प्रति किमी या हिशोबाने वाहनांना टोल आकारणी करण्यात येतेय.
समृद्धी महामार्ग - नागपूर ते शिर्डी
अंतर ५२० किमी
वाहन | प्रति किमी | एकूण टोल |
१. मोटार-जीप | १.७३ ₹ | ९००₹ |
२. मिनी बस | २.७९ ₹ | १४५१ ₹ |
३. बस, ट्रक | ५.८५ ₹ | ३०४२₹ |
४. अवजड वाहनं | ९.१८ ₹ | ४७७४ ₹ |
५. अति अवजड वाहनं | ११.१७ ₹ | ५८०८ ₹ |
विशेष म्हणजे हे दर प्रत्येक तीन वर्षांनी वाढणार आहेत. मुंबई ते नागपूर अशा पूर्ण मार्गाचा विचार केला तर हे टोलचे दर आणखी जास्त असणार आहेत.
समृद्धी महामार्ग - नागपूर ते मुंबई
अंतर ७०१ किमी
वाहन | प्रति किमी | एकूण टोल |
१. मोटार-जीप | १. ७३ ₹ | १२१३ ₹ |
२. मिनी बस | २. ७९ ₹ | १९६६ ₹ |
३. बस, ट्रक | ५. ८५ ₹ | ४१०० ₹ |
४. अवजड वाहनं | ९.१८ ₹ | ६४३५ ₹ |
५. अति अवजड वाहनं | ११.१७ ₹ | ७८३० ₹ |
या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींना या टोलमधून सूट असेल. यात राज्याच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. पोलिसांची वाहनं आणि रुग्णवाहिकांनाही या मार्गावर टोल द्यावा लागणार नाही. एकूणच समृद्धी महामार्ग सुरु झाला असता आणि मुंबई ते नागपूर काही तासांनी कमी होणार असले तरी त्याची झळ सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला सहन करावी लागणारच आहे. इतकंच नाही तर कालांतरात त्यात वाढच होणार आहे.