सिंहगड इन्स्टिट्युटुशनचा ईटीएस कंपनीसोबत सामंजस्य करार
○ महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग: जानेवारी २०२३ मध्ये ईटीएस कंपनीकडून मोफत मिळणार प्रशिक्षण
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन "इंग्लिश ऑलिम्पियाड" स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामधुन सिंहगड इन्स्टिट्युटुशनचा ईटीएस कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी "इंग्लिश ऑलिम्पियाड" स्पर्धेत भाग घेतला होता. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग शिक्षण घेऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना जी. आरई, टोफिल ची परीक्षा देणे आवश्यक असते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने इंग्रजी सुधारण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जानेवारी २०२३ मध्ये कंपनीकडून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचे आहे अशा विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्युट मदत करत असते.
डिपिक्युब हि ईटीएस या कंपनीचा अविभाज्य घटक आहे. सिंहगड संस्थेत विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्ष या कालावधीत ईटीएस कंपनीकडून मोफत इंग्रजीचे प्रशिक्षण दिले जाणार असुन या एँक्टिव्हीटी चा फायदा सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी तसेच परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी होणार आहे.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्पर्धेत सर्वाधिक उपस्थित दाखविल्याने ईटीएस कंपनीकडून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजला सन्मानचिन्ह देण्यात आले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.