राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टाने निकाल दिला. त्या वेळी सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले होते. राऊतांना जामीन मंजूर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, त्यावेळी राऊत मात्र याबाबत गोंधळात पडले. त्यांना काही क्षण काय झाले, हेच लवकर कळाले नाही. त्या वेळी त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती दिली.
क्षणार्धातच राऊतांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. 'आता मी पुन्हा लढेन, न्यायालयाचे आभार, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता, अशी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र, ती अत्यंत बोलकी होती. राऊतांच्या जामीनावरील सुनावणी वेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. न्यायालयाचा कुटुंबीयही भावूक झाले होते. न्यायालयात सुनावणी वेळी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी आणि त्यांचे भाऊ उपस्थित होते.
राऊतांना जामीन मंजूर होणे, हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा आहे. एवढेच नाहीतर राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राऊत यांना जामीन मिळताच न्यायालायच्या देखील टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळाले. 100 दिवसांनी राऊतांना जामीन मंजूर झाला आहे.