उद्योजक मा. विनोदराज लटके मित्रपरिवार यांच्यावतीने पंढरपूर येथे आमदार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0
उद्योजक मा. विनोदराज लटके मित्रपरिवार यांच्यावतीने पंढरपूर येथे आमदार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त उद्योजक मा. विनोदराज लटके मित्रपरिवार यांच्यावतीने पंढरपूर येथे आमदार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार मा. दादासाहेब यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी व पर्यावरण हित जोपासण्यासाठी अशा विविध स्पर्धा आयोजित होणे काळाची गरज आहे. सदर स्पर्धेत तब्बल दीड हजार स्पर्धकांनी ( मुले व मुली) सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र जी पाटील, पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक श्री.अरुण फुगे साहेब व मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड यांच्या शुभहस्ते झाले. 
यावेळी बक्षीस वितरण समारंभ पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी या स्पर्धेत विशेष सहकार्य पंढरपूर पोलिस वाहतूक शाखेचे पवार साहेब, माने साहेब व रनर असोसिएशनकडून झाले.
यावेळी सर्व आवताडे प्रेमींनी उपस्थित राहून सहकार्य केले. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !