"दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही " सुषमा अंधारे यांची राणेंवर खोचक टीका ;
यावरुन अंधारेंनी घणाघात करताना दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही, असं त्या म्हणाल्या. ही विचारानिंही बारकी असलेली पोरं कोणत्याही भाषेत बोलतात पण फडणवीस काही करत नाहीत, असा टोला देखील अंधारेंनी लगावला आहे. यादरम्यान, भाजपने द्वेषमाचं राजकारण सुरू केलंय. ते राजकारण थांबलं पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे असं केवळ म्हणतात.
पण त्यासाठी काही न करता ते वाढवण्यासाठी त्यांनी अमराठी टीम तयार केली आहे. किरीट सोमय्या, राणा दाम्पत्य असे अनेक लोकं फडणवीसांनी उभी केली आहेत, असा घणाघात देखील सुषमा अंधारेंनी भाजप पक्षावर केला आहे. सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ लावून भाषण केला. याचवेळी, लाव रे तो व्हिडिओ हा त्यांचा उर्मटपणा. आपण दादा व्हिडिओ लाव म्हणू", असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला, असा टोला अंधारेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.