पंढरपूर सिंहगड मध्ये "मायक्रोप्रोसेसर" विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी : नागेश काळे
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात ४ नोव्हेंबर २०२२ रोजी डाॅ. जी. डी. उपाध्ये यांचे व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाची सुरुवात सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान काॅम्प्युटर सायन्स अँड. इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांचे हस्ते डाॅ. जी. डी. उपाध्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यादरम्यान डाॅ. जी. डी. उपाध्ये यांनी बेसिक कन्सेप्ट, मायक्रोप्रोसेसर अँड्रेसिंग मोडस हे अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितले. हे व्याख्यान काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या व्याख्यानाचे सुञसंचलन प्रा. धनश्री सुरवसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. उदयकुमार फुले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.