विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेला वाव देणारे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत- डाॅ. कैलाश करांडे
⭕ "सिंहगड पंढरपूर मध्ये महाविद्यालयस्तरीय अविष्कार २०२२ संपन्न"
पंढरपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांच्या प्रोत्साहनामुळे सन २००६ पासून प्रतिवर्षी अविष्कार ही संशोधन प्रकल्प स्पर्धा शैक्षणिक संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हे उद्दीष्ट ठेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रतिवर्षी आविष्कार हा उपक्रम राबवित असते. यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून नवसंशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम महाविद्यालय स्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते. या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे पेटंटमध्ये परिवर्तन करावे, त्यासाठी लागणारे सर्व पाठबळ महाविद्यालयाकडून दिले जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेला वाव देणारे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे मत डाॅ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आविष्कार या स्पर्धेच्या उद्दिष्टांबद्दल मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अशा एकूण ३ स्तरावर १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, या स्पर्धेतून प्रत्येक विभागातून एक विजेता निवडला जाईल, जो विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या अविष्कारमध्ये सहभागी होईल अशी माहिती या स्पर्धेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.
हा कार्यक्रमास डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. चेतन पिसे, डॉ संपत देशमुख, डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. अतुल आराध्ये यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध विभागप्रमुख व प्रा. राहुल शिंदे, प्रा. शशिकांत साठे, प्रा. रमेश येवले, प्रा. किशोर जाधव, प्रा. अंजली पिसे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. यशवंत पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.