ऊसदर संघर्ष समितीकडून ऊस वाहतूक रोखण्यासाठी भर रस्त्यात भजन कीर्तन आंदोलन
प्रतिनिधी : मंगळवेढा
ऊस दर संघर्ष व कारखानदार व यांची ऊस दर प्रश्नीं बैठक निष्फळ ठरल्या नंतर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत ,त्यानी आज बोराळे गावात ऊस वाहतूक रोखण्यासाठी भर रात्री बोराळे गावाच्या मुख्य चौकात ठिया मांडला आहे.व शेतकऱ्यांनी सोबतच भजन व किर्तन सुरु करून एक अनोख आंदोलन सुरु केल्यामुळे आज बोराळे गावातुन ऊस वाहतूक बंद आहे.
त्यामुळे बैठक निष्फळ ठरताच शेतकऱ्यांनी आक्रमक पण अनोख आंदोलन सुरु केल्यामुळे गावातील लोकांनी त्यास पाठींबा दर्शवाला आहे या आंदोलास पाठींबा देण्यासाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. राहुल घुले बोराळे गावाचे माजी संरपंच गणेश गावाकरे ,अण्णा भोजने,नंदूर अध्यक्ष महादेव येडगे,चेतन शेडजी,शांतप्पा कुंभार,सुभाष नकाते,आरळी गावचे सरपंच मल्लिकार्जुन भांजे संदीप बाबर व परिसरातीला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित आहेत.