ही योजना पोस्ट ऑफिस मार्फत आहे. यात दिवसाला फक्त ९५ रुपये भरावे लागतात. सुमंगल ग्रामीण पोस्ट जीवन विमा योजना असे या योजनेचे नाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवता यावेत आणि त्यातून त्यांना जास्त फायदा मिळावा असा याचा उद्देश आहे. या मनी बॅक योजनेत गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवता येते. कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती यात सहज गुंतवणूक करू शकतात. या योजनेला केंद्र सरकारने देखील हमी दिली आहे. त्यामुळे ही पूर्णतः: सुरक्षित योजना आहे.
काही कालावधी नुसार इथे गुंतवणूक केली जाते. यात १९ ते ४० वर्षातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तसेच मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर जमा झालेली रक्कम परत मिळते. जर त्या आधी गुतवणूकदाराचा मृत्यू झाला तर ही रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. यासाठी १५ ते २० वर्षे हा किमान कालावधी आहे.
१५ वर्षांसाठी गुंतवणूक केली असल्यास कालावधी पूर्ण झाल्यावर ही रक्कम ६. ९ आणि १२ वर्षांनी परत केली जाते. २० टक्के रक्कम परत मिळाल्यावर उर्वरित ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीवर मिळते. पॉलिसीचा कालावधी जर २० वर्षांचा असेल तर ८, १२, १६ वर्षांनी २० टक्के मनी बॅक मिळतो. तर ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीवर मिळते.
उदा., गुंतवणूकदाराचे वय २५ वर्षे आहे. त्याने २० वर्षांच्या कालावधीत १ लाख रुपये गुंतवले आहेत. यासाठी त्याने दिवसाला ९५ रुपये जमा केले. मॅच्युअरिटीपर्यंत व्याजासकट ही रक्कम १४ लाख झाली आहे. तर २१ व्या वर्षी महिन्याला त्याला २६५३ रुपये दरमहा मिळतील. २० टक्के रक्कम त्याला मिळाल्यावर ४० टक्के रक्कम मॅच्युअरिटीवर मिळेल.