गोल्ड लोन घेऊन वाढवा क्रेडिड स्कोअर ,मात्र कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या बाबी

0

गोल्ड लोन घेऊन वाढवा क्रेडिड स्कोअर ,मात्र कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या बाबी


प्रतिनिधी  : लोकं गरज पडल्यानंतर कर्ज घेतात. कर्ज (loan)ही एक आर्थिक मदत आहे.कर्जदार वेळेवर कर्जाचा परतावा करणार या आशेनं आर्थिक संस्था (lender)कर्ज देते. वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास क्रेडिट स्कोअर वाढण्यात मदत होते.

क्रेडिट स्कोअरमधून एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर दिसून येतो. क्रेडिट स्कोअरमुळे आपण कर्जाची परतफेड किती प्रामाणिकपणे केली आहे हे दाखवतो. मग अशावेळी गोल्ड लोन (Gold loan) म्हणजेच सोनं तारण कर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का ? हा मोठा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. गोल्ड लोनचा हप्ता वेळेत भरल्यास क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा होते. तर हप्ता वेळेत न भरल्यास क्रेडिट स्कोअर खराब होतो.

वारंवर कर्जासाठी विचार केल्यास क्रेडिट स्कोअरवर परिणाम
गोल्ड लोनसाठी अर्ज केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो, मात्र त्यात एक मेख आहे. तुम्ही गोल्ड लोनसाठी अर्ज केल्यानंतर बँक किंवा आर्थिक संस्था क्रेडिट ब्युरोकडून क्रेडिट अहवाल मागवतात त्यानंतर तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही याचा निर्णय घेतला जातो? यालाच कसून चौकशी करणं असे म्हणतात. अशा प्रकारची चौकशी तुमच्या क्रेडिट स्कोअर अहवालात दिसून येते. विना चौकशी कर्ज मिळत नाही. अशावेळी क्रेडिट अहवालात कर्जाबाबत चौकशी केली आहे दिसून येते यात फारशी अडचण नाही. मात्र,क्रेडिट अहवालात (Credit report)वारंवार कर्जाबाबत चौकशी केलेली दिसत असल्यास तुम्हाला कर्जाची खूप गरज आहे किंवा तुम्ही गरजेपेक्षा जास्त कर्ज घेत आहात हे दिसून येते. यातील कोणताही संकेत चांगला नाही त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.


कर्जाची परतफेड वेळेवर करा

गोल्ड लोन घेतल्यानंतर तुम्हाला निर्धारित अटी आणि शर्थींनुसार कर्जाची परतफेड करावी लागते. अटीनुसार कर्जाची परतफेड केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो. चांगला क्रेडिट स्कोअर करण्यासाठी कर्जाचा EMI म्हणजेच हप्ता वेळेत भरणे गरजेचे आहे. वेळेवर हप्ता भरल्यास तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात प्रामाणिक आहात हे दिसून येते आणि अशा व्यक्तींना बँका सहजपणे कर्ज देतात. एवढेच नाही तर काही आर्थिक संस्था कर्ज देताना कमी व्याज दरातही कर्ज देतात.तर दुसरीकडे कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास म्हणजेच डिफाल्ट झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर तर खराब होतोच त्यासोबतच विलंब शुल्कही भरावे लागते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !