अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या गरबा दांडिया स्पर्धेला उदंड प्रतिसाद
(सिनेअभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या उपस्थित पार पडला कार्यक्रम)
प्रतिनिधी/-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून *विठ्ठल प्रतिष्ठान* यांनी दि.०२ऑक्टोबर रोजी संत तनपूरे महाराज मठ येथे भव्य दिव्य गरबा दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पृहा जोशी: अभिजीत आबा पाटील यांचे मनापासून आभार मानते की, पंढरपूर शहरात मोठा गरबा दांडिया स्पर्धेचे आयोजन करून उद्घाटन करण्याची संधी आणि पंढरपूर करांसोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. भविष्यात प्रतिष्ठान च्या माध्यमातून असंख्य समाजपयोगी उपक्रम राबवून शहराला गती द्यावी.
यामध्ये पंढरपूर शहरासह इतर तालुक्यातील दांडिया स्पर्धेकानी भरारीने सामील होत प्रतिसाद दिला.
लहान गटात साईशा उन्हाळे तसेच मोठा गटामध्ये संजना गुप्ता,अवनी गुंडेवार,नारायण उत्पात,मोहिन खान,लोखंडे, झवेरी यांना स्कुटी व फ्रीज, टीव्ही, ओव्हन, सायकल आशा विविध बक्षीस वितरण करण्यात आली.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील म्हणाले, *विठ्ठल प्रतिष्ठान* इथून पुढे समाजासाठी कार्यासाठी कार्यरत राहिल. आणि त्यामाध्यमातून येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये माणुसकीची भिंत म्हणून प्रतिष्ठान उपक्रम राबवणार आहे.दांडियाच्या या कार्यक्रमास पंढरपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वाचे आभार मानले तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले, विठ्ठल व्हा.चेअरमन प्रेमलताताई रोंगे , मा जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, मवारे मॅडम, सुमित्रा अभिजीत पाटील तसेच विठ्ठल कारखान्याचे व धाराशिव साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.