सिंहगडाच्या जोत्सना राऊतची ३ नामांकित कंपनीत निवड
○ वार्षिक ४ लाखांचे पॅकेज: प्राचार्य कैलाश करांडे यांची माहिती
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच कुमारी जोत्सना मुरलीधर राऊत हिने काॅग्निझंट, टीसीएस व विप्रो या तीन कंपनी मध्ये
कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात काॅग्निझंट, टीसीएस व विप्रो या तीन कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आल्या होते. या कॅम्पस ड्राईव्ह मधुन पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेल्या सांगोला येथील कुमारी जोत्सना मुरलीधर राऊत हिला काॅग्निझंट, टीसीएस व विप्रो या तीनही कंपनीकडून नोकरी संधी प्राप्त झाली असुन तीच्या या यशाबद्दल सर्वस्तरांतुन अभिनंदन होत आहे.
अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण करून विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असेलले सिंहगड महाविद्यालयाने प्लेसमेंट मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे मानवी अधिकार, मुलभुत अधिकार अबाधित राखून पालकांच्या विश्वास पाञ ठरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण, गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणजे पंढरपूर सिंहगड असा वेगळा नावलौकिक सिंहगड संस्थेचा संपूर्ण जगभर आहे.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील कुमारी जोत्सना मुरलीधर राऊत हिची काॅग्निझंट (वार्षिक पॅकेज- ४ लाख), टीसीएस (वार्षिक पॅकेज ३.३७ लाख) आणि विप्रो (वार्षिक पॅकेज-३.५० लाख) या तीन कंपनीत कुमारी जोत्सना राऊत यांची मुलाखतीतून निवड झाली आहे. यापैकी कुमारी जोत्सना मुरलीधर राऊत हि काॅग्निझंट कंपनीत नोकरी करणार असल्याचे यादरम्यान तिने सांगितले आहे.
कोरोना कालावधीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने २०० हून अधिक नामांकित कंपनीत ऑनलाईन मुलाखतीतून नोकरी देण्याचे काम पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने केले असल्याचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी सांगितले. कुमारी जोत्सना राऊत हिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अमोल कांबळे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.