श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या वतीने सभासद, कामगार व पत्रकार यांना दिपावली निमित्त साखर वाटप सुरू
वेणुनगर, दि. १२ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त सर्व सभासद, कामगार व पत्रकार यांना रू. २५/- प्रती किलो याप्रमाणे २५ किलो साखर वाटपाचे धोरण मा. संचालक मंडळाने जाहीर केले होते, त्याप्रमाणे बुधवार दि.१२.१०.२०२२ पासून कारखाना साईटवर व पंढरपूर शहरामध्ये समृध्दी ट्रॅक्टर शोरूम शेजारी, कॉलेज रोड, पंढरपूर येथेही साखरेचे वाटप चालू केलेले आहे. सदर साखर वाटपाच्या पंढरपूर येथील केंद्राचे उद्घाटन धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री अमर पाटील साहेब व श्री विठ्ठल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मा. श्री दिनकर चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले.
श्री विठ्ठल कारखाना हा गेली २ वर्षापासून बंद असल्यामुळे सभासद, कामगार यांना कारखाना साखर देऊ शकला नव्हता, परंतु विद्यमान चेअरमन यांचे मार्गदर्शनाखाली गत सिझन बंद असतांनाही बाहेरच्या कारखान्याकडून साखर विकत घेऊन सर्व सभासद व कामगारांना दिपावली गोड करणेसाठी साखर वाटप केल्यामुळे सभासद व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक, प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड तसेच सर्व अधिकारी, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.