पंढरपूर रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
पंढरपूर: प्रतिनीधी
समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून शालेय गणवेश वाटप करण्यात आला असल्याची माहिती पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशालेतील आर्थिक परिस्थितीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात रोटरीचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, सचिव रो. सचिन भिंगे, प्रकल्प प्रमुख रो. सीए. अमोल भालेराव, रो. डॉ. मिलिंद लोटके, रो. मिलिंद वंजारी, माजी अध्यक्ष किशोर निकते, रो. बापूसाहेब बागल, संजय कपडेकर, विनोद भाटिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपटे उपलप प्रशालेतील भारत आलमिले, सागर थिटे सह सेवक वाघमारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत हरिदास यांनी केले.