प्रथम वर्ष अभियांत्रिकी निकालामध्ये पंढरपूर सिंहगडचा डंका
○ ९५.६४ टकके मार्क्स मिळवून संध्या पाटील विद्यापीठ प्रथम : प्राचार्य कैलाश करांडे यांची माहिती
पंढरपूर: प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचेकडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालामध्ये कोर्टी (ता.पंढरपूर) येथील सिंहगड काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सोलापूर विद्यापीठाकडून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी परीक्षेत एकुण ८२ विद्यार्थ्यांना १० पैकी १० जीपीए मिळाला असुन यापैकी ४७ विद्यार्थी हे पंढरपूर सिंहगडचेच आहेत. महाविद्यालयातील कुमारी संध्या धनाजी पाटील हिने ९५.६४ टक्के गुण मिळवून विद्यापीठाच्या सर्व विभागातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
यामध्ये विद्यापीठाच्या गुणानुक्रमे पहिल्या ५ क्रमांक मध्ये पंढरपूर सिंहगडचे ३ विद्यार्थी तर पहिल्या १० मध्ये ६ विद्यार्थी हे पंढरपूर सिंहगडचेच आहेत.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या निकालात पंढरपूर सिंहगडने बाजी मारली असुन ७६ विद्यार्थ्यांना ९० टक्के हुन अधिक गुण मिळाले आहेत. महाविद्यालयाचा प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे.
अल्पावधीतच पंढरपूर सिंहगडने उंतुग झेप घेतली असून प्रत्येक वर्षी शैक्षणिक निकाल हे वाढत असल्याने पालकांमधुन सिंहगडचे महाविद्यालयाचे कौतुक होत आहे. चालु वर्षात पंढरपुर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षांत ४३५ हून अधिक विद्यार्थ्यांना नामंकित कंपनी नोकरी मिळवून देण्याचे काम पंढरपूर सिंहगडने केले आहे. पालक व विद्यार्थ्यांच्या विश्वासास पाञ राहुन सिंहगड महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.