पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्यांची केपीआयटी कंपनीत निवड
○ विद्यार्थ्यांना मिळणार ४ लाख वार्षिक पगार: प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांची माहिती
पंढरपूर: प्रतिनिधी
केपीआयटी टेक्नॉलॉजीज' या कंपनीची राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारामध्ये २०१८ मध्ये झाली आहे. जानेवारी २०१८ मध्ये केपीआयटीच्या मर्जर आणि डीमर्जर व्यवहाराची घोषणा होऊन हा व्यवहार जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला. या व्यवहाराने ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग आणि मोबिलिटी सोल्युशन्सवर भर देणारी केपीआयटी टेक्नोलॉजीज आणि आयटी सेवांवर लक्ष केंद्रित करणारी बिर्लासॉफ्ट या दोन पब्लिक ट्रेडेड स्पेशलाइझ्ड टेक्नोलॉजी कंपन्या स्थापन झाल्या आहेत. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने अल्पावधीतच सातत्यपूर्ण निकाल व नामांकित कंपनीत प्लेसमेंटची परंपरा कायम ठेवली आहे. नुकताच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव इंजिनिअरींग काॅलेज आहे. विद्यार्थ्यांना देशाचा सुसंस्कृत तसेच सृजनशील नागरिक घडविण्याचे काम पंढरपूर सिंहगड महाविद्यालय मोठ्या दिमाखात करत आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी नोकरी न मागे लागता स्वतःच उद्योग उभा करून लाखो रूपये कमवत आहे. याशिवाय पंढरपुर सिंहगड महाविद्यालय विद्यार्थ्यांना नोकरी निर्माण करणार आदर्श उद्योजक घडविण्याचे काम करत आहे.
महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील आकाश महादेव शिंदे, अर्थव नितीन परिचारक, रोहित राजेंद्र बागल, निकीता तात्यासो गावंधरे, आरती सदाशिव जमदाडे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ॠतुपर्णा रणजित लावंड आदी ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून केपीआयटी टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड कंपनीत निवड झाली असून कंपनीकडून ४ लाख वार्षिक पगार मिळणार आहे.
कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.