पत्रकार सुरक्षा समिती पूर्णा शहर कार्यकारिणी जाहीर
पूर्णा (प्रतिनिधी):- पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र च्या पूर्णा शहर कार्यकरिणी बैठक पूर्णा शहरातील नगर परिषद सभागृहात संपन्न झाली. वतीने राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी घरकुल योजना,विमा योजना, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता, पत्रकारावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी, राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत, या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वारंवार आंदोलन उपोषण निवेदन देऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या न प सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत सर्वानुमते शहर अध्यक्ष- दर्जा महाराष्ट्र न्युज व दै लोकपरिषद जिल्हा प्रतिनिधी अनिल अहिरे,शहर कार्याध्यक्ष- आवाज परभणीचा न्युज चॅनल चे राजू गायकवाड,उपाध्यक्ष-दै महाराष्ट्र प्रतिनिधी शेख समी,उपाध्यक्ष महाबोधी न्यूज चॅनल चे परभणी प्रतिनिधी मनोज भुजबळ,सचिव - ए जी एन ता प्रतिनिधी संजय वाघमारे,सह सचिव - महाराष्ट्र प्रतिमा प्रतिनिधी श्रीहर घुले,आदींची नियुक्ती करण्यात आली.