जन धन खाती उघडताना लोक प्रश्न उपस्थित करत होते की, आपल्या देशात याची गरज आहे का? आज आम्ही जन-धन खात्यांद्वारे गरीब लोकांसाठी कल्याणकारी योजनांसाठी 25 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. ती एक उपलब्धी आहे, असे रेड्डी म्हणाले. रेड्डी पुढे म्हणाले की, 'आज गरिबांच्या जनधन बँक खात्यात 1.75 लाख कोटी रुपये जमा आहेत.
यापूर्वी, कर्नाटक बँकेच्या दोन डिजिटल बँकिंग युनिट्सने काम सुरु केले. पीएम मोदींनी विविध बँकांचे 75 डीबीयू राष्ट्राला समर्पित केले. यामध्ये कर्नाटक बँकेच्या या दोन्ही डीबीयूचा समावेश आहे. DBUs कार्यक्षम, पेपरलेस, सुरक्षित, कनेक्टेड वातावरणात कार्य करतील जिथे ते ग्राहकांना स्वयं-सेवा आणि सहाय्य मोडमध्ये बँकिंग वस्तू आणि सेवा प्रदान करतील.
याशिवाय, डीबीयू संबंधित जिल्ह्यात आर्थिक समावेशन आणि डिजिटल बँकिंग साक्षरतेला प्रोत्साहन देत आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष एमएस महाबळेश्वर यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'दोन डीबीयू उघडण्यासाठी बँकेची निवड करण्यात आली आहे. बँक शताब्दी वर्षात पदार्पण करत असल्याने हा विशेष सन्मान आहे.'