स्वच्छ सर्वेक्षणात’ दिल्ली येथे पंढरपूर नगरपालिकेचा सन्मान
नवी दिल्ली दि. 1 : ‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’ अंतर्गत देशातील झालेल्या स्पर्धेचा निकाल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते तलकोटरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आला.
‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज एकूण 23 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2022’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम 12 पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर आणि सचिव मनोज जोशी यावेळी उपस्थित होते.
या पुरस्कारांसोबतच पंढरपूर नगरपरिषदेला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हा पुरस्कार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अरविंद माळी यांनी स्वीकारला यावेळेस नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री शरद वाघमारे, श्री नागनाथ तोडकर,संतोष ऐतवाडकर, अभिजीत घाडगे आणि शहाजी चव्हाण हे उपस्थित होते.
या पुरस्काराने पंढरपूर नगरपालिकेला मिळालेला सन्मान,हा पंढरपूर शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेमध्ये दिलेल्या योगदानामुळे व नगरपालिकेच्या सांघिक प्रयत्नामुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली