कुत्रे निर्बीजीकरणं प्रकरणी यशवंत पवार यांच्या तक्रारी ची दखल अखेर टेंडर रद्द
सोलापूर (प्रतिनिधी )शहरातील वाढती कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका वतीने दरवर्षी कुत्रे निर्बीजीकरण प्रक्रिया राबवली जाते.
या प्रक्रियेसाठी विविध संस्थाना/कंपनी ना ऑनलाइन पद्धतीने टेंडर दिले जाते परंतु सोलापुरात २०१६ ते आजतागायत कुत्रे निर्बीजीकरण प्रक्रियेत महानगर पालिकेने विविध संस्था / कंपनी यांना कोट्यावधी रुपयांची बिले दिले आहेत कुत्रे निर्बीजीकरण करणाऱ्या संस्थेने / कंपनीने शहरातील कुत्र्यांची संख्या वाढवून महानगर पालिकेला लाखो रुपयांचा चुना लावला आहे , वास्तविक पाहता सोलापुरातील जनता कर रूपाने महानगर पालिकेला दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा कर देते परंतु काही संस्था महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुत्रे निर्बीजीकरण करण्याच्या नावाखाली महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारी देऊन लाखो रुपयांची बिले उचलून शहरातील नागरिकांच्या कर रुपी मिळणाऱ्या लाखो रुपयांवर डल्ला मारून भ्रष्टाचार करत आहेत याप्रकरणी कुत्रे निर्बीजीकरण प्रक्रियेत लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार करणाऱ्या संस्था / कंपनी यांना काळया यादीत टाकून त्यांच्याकडून महानगर पालिकेने दिलेले कोट्यावधी रुपये वसुल करण्यात यावेत त्याचबरोबर , कुत्रे निर्बीजीकरण भ्रष्टचार बाबत चौकशी होईपर्यंत कुत्रे निर्बीजीकरण प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूर महापालिका चे उपायुक्त श्री मच्छिंद्र घोलप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांच्या तक्रारी ची गंभीर दखल घेत अखेर कुत्रे निर्बीजीकरण प्रकिया चे टेंडर रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका उपआयुक्त यांनी दिली आहे.