सिंहगडच्या आरती शेळके ३ मल्टिनॅशनल कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी आरती राजकुमार शेळके हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मधील अनेक विद्यार्थी वेगळ्या नामांकित कंपनीत निवडले जात आहेत. काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेली कुमारी आरती राजकुमार शेळके हिची अँटॉस सिंटेल- ३.४०वार्षिक पॅकेज, विप्रो- ३.५ वार्षिक पॅकेज आणि कॅपजेमिनी- ४ लाख वार्षिक पॅकेज मिळाले असून कुमारी आरती राजकुमार शेळके हिने तीन कंपनीत कॅम्पस मुलाखती दिल्या होत्या. तिची तीनही कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन आरती शेळके हि "कॅपजेमिनी-४ लाख वार्षिक पॅकेज मिळणाऱ्या कंपनीत नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले.
वेगवेगळ्या नामांकित कंपनीत निवड झालेल्या कुमारी आरती राजकुमार शेळके हिचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.