थकीत ऊसबिले वाटप केलेबद्दल चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव संमत
वेणुनगर, पंढरपूर दि. ११ श्री विठ्ठल सह.सा.का.लि., वेणूनगरचे मागील २ वर्षापासून वकीत असलेले ऊसबिलाची रक्कम रुपये ३० कोटी बुडतात की, काय असे कारखान्याचे ऊस उत्पादक सभासदामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. परंतु कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील यांचेवर विश्वास दाखवून बंद पडलेला साखर कारखाना श्री अभिजीत (आबा) शिवाय इतर कोणासही चालू होणार नाही, याची सभासदांनी मनात खात्री बाळगून श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे पॅनल मधील सर्व उमेदवारांना निवडूण दिले.
या निवडणूकीच्या प्राचारादरम्यान श्री अभिजीत (आबा) पाटील यांनी निवडणूकीच्या प्रत्येक सभेमध्ये मागील थकीत ऊसबिलाचे पेमेंट दिल्याशिवाय कारखान्याचे सन २०२२-२३ गळीत हंगामाची मोळी टाकणार नाही, असे अभिवचन दिले होते. त्या पवित्र वचनामध्ये अधिक सुधारणा करून सन २०२२-२३ च्या बॉयलर प्रदिपना पुर्वीच ऊसबिल देवून सभासदांचा दाहिदिशास विश्वास संपादन केला आहे. त्याबद्दल रविवार दिनांक ११.०९.२०२२ रोजीच्या मा. संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये श्री अभिजीत (आबा) पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव पारित केला.