संजय कोकाटे यांची शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड
पंढरपूर प्रतिनिधी - (नागेश काळे)
शिवसेना शिंदे गटाच्या माढा लोकसभा संपर्कप्रमुख पदी शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार संजय कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीचे पत्र शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी दिले.
माढा व सांगोला तालुक्याच्या जिल्हा प्रमुख पदी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, माढा विधानसभेच्या प्रमुख पदी रामचंद्र धुळदेव टकले व माढा तालुका प्रमुखपदी मोडनिंब येथील वैभव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
टेंभुर्णी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नूतन माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व महाराष्ट्राचे आरोग्य.
मंत्री तानाजी सावंत व प्रा. शिवाजी सावंत यांच्या सहमतीने या पदावर ती माझी नियुक्ती झाली असून मी या पदाला पूर्णपणे न्याय देऊन संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना जोमाने वाढवण्याचे काम करणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व माण विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेला बळकटी देऊन पक्ष विस्तार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Tags
Top news