सिंहगडच्या दोन प्राध्यापकांना "आदर्श शिक्षक" पुरस्कार

*सिंहगडच्या दोन प्राध्यापकांना "आदर्श शिक्षक" पुरस्कार*

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये यावर्षीपासून प्रथमच "आदर्श शिक्षक" पुरस्कार देण्यात आले. यादरम्यान महाविद्यालयातील डाॅ. संपत देशमुख व प्रा. सुमित इंगोले यांना यावर्षीचा "आदर्श शिक्षक" पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
     एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये ५ सप्टेंबर रोजी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प जयवंत महाराज बोधले उपस्थित होते. यादरम्यान महाविद्यालयातील अधिष्ठाता डाॅ. संपत देशमुख व काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रा. सुमित इंगोले यांना महाविद्यालयाकडून "आदर्श शिक्षक" म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
     शिक्षक म्हणजेच शी-शीलवान, क्ष-क्षमशील, क-कर्तृत्ववान. ज्यामध्ये हे सर्व गुण असतात तो खरा आदर्श शिक्षक. शिक्षकांनी चांगल्या केलेल्या कामाची नोंद वेळोवेळी झाली पाहिजे. शिक्षकांमधील आदर्श गुणांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो, आपल्या कार्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे ही भावनाही सुखावून जात असते. पुरस्कार मिळणे हेच काही सर्वस्व नसते परंतू शिक्षकाच्या कार्यासाठी हाच खरा पुरस्कार असतो.
     या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अवंती कोरे हिने केले तर उपस्थितांचे आभार डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post