नवीन फीचर्स सह वॉट्सएप होणार अपडेट। जाणून घ्या काय आहेत ते ।
वॉट्सएपच्या नवीन फिचर्सनुसार आता पाठविलेला संदेश (Message) एडीट (Edit) करता येणार आहे. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. यावर सध्या काम सुरु आहे.
हे फिचर्स त्यावेळी भरपूर कामाचे असेल, जेव्हा आपण घाईघाईत एखादा चुकीचा संदेश टाईप करुन पाठवितो. WB च्या माहितीनुसार हे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या नवीन फिचर्सला वॉट्सएप बीटा 2.22.20.12 अपटेडमध्ये सामाविष्ट केले जाणार आहे.
अद्याप हे फिचर्स कसे काम करणार, याची कोणतीही माहिती उपल्बध नाही. पण आगामी काळात ती लवकरात लवकर उपल्बध होण्याचा संभव आहे. प्राप्त माहितीनुसार सेंट (Sent Message) केलेल्या संदेशासोमर एडीटचा ऑप्शन येणार आहे. परंतु एडीट करण्यासाठी काही मर्यादीत कालावधी (Time limit for edit the message) दिला जाणार आहे.