सावकार पीडित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे उपोषण


सावकार पीडित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे उपोषण

प्रतिनिधी सोलापूर : महाराष्ट्रामध्ये अवैध सावकारी बोकळल्यामुळे 2014 ला सावकारी कायदा अस्तित्वात आला. परंतु कायदा अस्तित्वात आल्यानंतर जे महाराष्ट्रात आणि कायदे झाले त्यापैकीच हा एक कायदा अशी अवस्था या कायद्याची झाली कारण त्याची  अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे आहे त्या पद्धतीने झालेली नाही. अवैध सावकर तारण म्हणून शेतकर् याकडे असलेल्या जमीन पैकी काही जमीन,घर जागा खरेदी घेतात. तारण मालमत्तेचा व्यवहार होऊन दोन वर्षे ते दहा वीस पंचवीस वर्षे झालेले आहेत.
जोपर्यंत शेतकरी सावकाराला व्याज देतो आहे, तोपर्यंत सावकार शांत असतो. आणि  शेतकरीची परिस्थिती नैसर्गिक आपत्तीने, अतिवृष्टीने, दुष्काळाने,महा भयंकर आजाराने बिघडती, आणि व्याज देणे शक्य होत नाही, त्या वेळेला सावकर जमिनीचा ताबा घेण्यासाठी तगादा लावत असतो. जमीन ही तारण असल्याने ती शेतकऱ्यांच्या ताब्यात असते.ज्यावेळेला सावकार तारण दिलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी गावगुडांचा. वापर करतो,  त्यावेळेला शेतकरी आणि सावकार असा संघर्ष निर्माण होतो. आणि सामान्य माणसाला कींवा सामान्य सावकार पीडित शेतकर्याला सर्वप्रथम न्याय मागण्याची व्यवस्था आपल्या न्यायव्यवस्थेने केलेले आहे ती म्हणजे पोलीस स्टेशन. परंतु महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेला पीडीत शेतकरी सावकारांची विरोधात तक्रार द्यायला जातो त्यावेळेला सावकाराचे  लागेबांधे, आर्थिक देवाणघेवाण ही  पोलीस स्टेशनशी निगडित असल्यामुळे किंवा देवाण  घेवाण चालू असल्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे पोलीस स्टेशन कधीही गंभीरतेणे पाहत नाहीत. उलट त्यांचा सातबारा आहे.तुम्ही त्यांचा कशासाठी वहिवाट आहात सातबारा त्यांचा हे आम्हाला काही सांगू नका. 
अशा प्रकारे दम दिला जातो.आणि शेतकऱ्याची तक्रार्याची  घ्याण्यची टाळली जाते. त्यावेळेला शेतकरी निराश होतो. आणि ह्या निराशेतूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढलेले आहे. 22/9/22 ला सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री कांतीलाल नाईकनवरे पटवर्धन कुरोली व जिल्हातील सावकार पीडित शेतकरी, ज्यांना जगणे अवघड झाले आहे. आशा माता भगिनींना घेऊन,आत्महत्या सारख्या गंभीर गोष्टी कडे शासनाने लक्ष  वेधण्यासाठी ऐक दिवशीय लाक्षणिक उपोषण करुन जिल्हाधिकारी साहेब व व एस पी ऑफिसला,  निवेदन दिलेले आहे. आमच्या मागण्या आहेत की
सर्वप्रथम पोलीस स्टेशनचीच मदत शेतकऱ्याला घ्यावी लागते. आणि पोलीस स्टेशन शेतकऱ्याला मदत करत नाही. शेतकऱ्याला मदत करायची सोडून सावकाराची  बाजू धरुन, न्याय (मदत)मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दम दिला जातो. नाईलाजास्तव शेतकऱ्याला तक्रार न देता परत फिरावे लागते. अशा अनेक गोष्टी आमच्या निदर्शनात आलेले आहेत. त्यानंतर आम्ही मागील वर्षी एस पी ऑफिसला पत्र दिलं होतं. आणि ही गंभीर बाब त्याच्या निर्दशनास आणुन दिले होती. सोलापूर जिल्ह्यातील सर्व  पोलीस स्टेशनला आपल्या मार्फत एक सूचित करण्यात यावे की, कुठल्याही पोलीस स्टेशनला शेतकरी येतील त्या शेतकऱ्यांना सावकाराच्या विरोधात तक्रार देताना कसलीही अडचण आणता, तक्रारी लिहून घेऊन त्याची शहानिशा केली पाहिजे. एस पी ऑफिस कंडुन तशा सूचना काही  पोलीस स्टेशनला गेल्याही  काही पोलीस स्टेशनची  सुधारणा सुद्धा झाली. परंतु अजून अनेक पोलीस स्टेशन अशा गबरगंड  सावकाराच्या दाबा दबावाखाली चालत आहेत.परीणामी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही . सावकारी अधिनियम 2014 यामध्ये प्रथमदर्शनी सावकारी दिसल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याच्या घराची झडती घेतली पाहिजे अशा अनेक  कायद्यात तरतूदी सुद्धा आहेत.परंतु डी डी आर ऑफिसकडून हे काम पोलीस स्टेशनचे आहे. असे सांगून सावकारावर गुन्हा दाखल होत नाही. व वेळ मारून नेली जाते. तसेच पोलीस स्टेशनकडून सातबारा त्यांच असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करनार नाही. तुम्ही निबंधकाकडे जा ते त्याचे काम आहे. म्हणून शेतकऱ्याला तिथूनही हाकलून दिले जाते  तेव्हा आम्ही या निवेदनातून  कलेक्टर साहेबाकडे अशी मागणी केली की ही जबाबदारी कोणाची आहे. मीटिंग घेऊन एकदा निश्चित करा. आणि ज्यांची जबाबदार असेल त्यांनी इथून पुढे तातडीने कारवाई केली पाहिजे.आता चालू असलेल्या व प्रथम दर्शनी सावकारकी दिसत असलेल्या डी डी आर कडील  सर्व प्रकरणामध्ये ज्यांची जबाबदारी आहे, त्यांनी सावकारांवरती गुन्हे दाखल करुन संपूर्ण सावकारी सिद्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही या निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना व एस पी ऑफिस ला इशारा देत आहोत, आमच्याया  निवेदनाची दखल  घेण्यात यावी. जद दखल घेतली नाही तर येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील पिडीत  शेतकरी व समिती पदाधिकारी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालया पुढे आमरण उपोषण करतील.  याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

मी माया भोसले शेंद्री ता. माढा,जिल्हा सोलापूर. 
 माझा मालकाची(उतरेश्वर भोसले)  उस्मानाबाद जनता बँकेने चे शाखाआधीकारी व सावकार यांनी फसवणूक केली आहे. या निवेदनातून ईशारा देते आहे की या बँकेची चौकशी करून आम्हला न्याय द्यावा. आन्यथा आमच्या पुढे मरणाला कैटाळण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही.

Post a Comment

Previous Post Next Post