सिंहगडच्या १० विद्यार्थ्यांची "अँटॉस सिंटेल" कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची "अँटॉस सिंटेल" कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊन पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात एक दबदबा निर्माण केला आहे. विद्यार्थ्याच्या हिताचे शिक्षण देऊन पालकांच्या विश्वासास पात्र असलेले पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील "अँटाॅस सिंटेल" कंपनीत साक्षी राहूल उपलप, ज्ञानेश नंदकुमार भागानगरे, प्रणिती भारत शिंदे, सुमेरा शमसुद्दीन शेख, आरती राजकुमार शेळके,
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील रोहन श्यामराव कसबे, रूपाली कांबळे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील कौसार बालम मुजावर, सुरज पांडुरंग राऊत, अविनाश डोके आदी विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.
"अँटाॅस सिंटेल" हि कंपनी एकात्मिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवांची बहुराष्ट्रीय प्रदाता आहे. या कंपनीचे नेतृत्व राकेश खन्ना करत असुन ७३ देशांमधील १२०,००० कर्मचारी आणि १२ अब्ज पेक्षा जास्त वार्षिक महसूल असलेल्या
कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३.४० लाख पगार मिळणार आहे.
या निवडी दरम्यान कंपनी कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक व तांत्रिक चाचणी घेण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त, समर्पक, योग्य व अचूक उत्तरे दिल्यामुळे कंपनीच्या अधिकारी समाधानी झाले. कंपनीत आवश्यक असलेले गुण पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याकडे दिसून आले. या निवडीमुळे विद्यार्थी व पालक वर्गात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
"अँटॉस सिंटेल" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.