पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये शिक्षण दिन उत्साहात साजरा

शिक्षक हा चांगल्या मनाचा असावा- ह.भ.प. जयवंत महाराज बोधले

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये शिक्षण दिन उत्साहात साजरा

पंढरपूर: प्रतिनिधी 

ज्ञान दानाचे पवित्र काम भारतीय संस्कृती करत आहे.  भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. आध्यात्म्याच्या पायावर उभी असलेली भारतीय संस्कृती आहे. आध्यात्म म्हणजे जे चांगले वाटेल ते अध्यात्म. शिक्षक हा चांगल्या मनाचा असणे आवश्यक आहे. तमोगुण, रजोगुण यांचे अभ्यासपूर्ण विस्तुतवर्णन केले. पालक आणि शिक्षक या मधुन विद्यार्थ्यांचा विकास होत असतो. सामाजिक शिक्षणाची भुमिका आज आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना शिक्षक शब्दाचा अर्थ शिक्षा, क्षमा, कर्तव्य असा अर्थ घेऊन शिकविण्याची गरज आहे. आजच्या शिक्षणावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. समाजात कार्य करीत असताना संस्कार, समन्वय असणे आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय कशाचे व्यसन नाही तो विद्यार्थी असतो. जीवनात सुख दुख येत असते. त्यावर मोठ्या सामर्थ्याने लढले पाहिजे. असे मत ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.
    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथे सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
     या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आली.
    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने 
डाॅ. संपत देशमुख व प्रा. सुमित इंगोले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आवंती कोरे व हर्षदिप कांबळे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post