सिंहगड मध्ये "डिझाईन थिंकिंग युजींग कँड-कँम इंजिनिअरींग" या विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात १९ सप्टेंबर रोजी "डिझाईन थिंकिंग युजींग कँड-कँम इंजिनिअरींग" या विषयावर प्रा. अलिम शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना "डिझाईन थिंकिंग युजींग कँड-कँम इंजिनिअरींग" याची माहिती व्हावी याच अनुषंगानेच प्रा. अलिम शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात प्रा. अलिम शेख मार्गदर्शन करताना म्हणाले, मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कॅड-कॅम इंजिनिअरींग मधील भविष्यात नोकरीच्या विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. इंडस्ट्री-४ या संकल्पनेचे महत्व सांगुन कॅड-कॅम मधील वापर आपण नवनवीन माॅडेल तयार कसे करू शकतो, तसेच ॲन्सीस या साॅफ्टवेअरचा कसा वापर करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रा. अलिम शेख यांचे स्वागत प्रा. धनंजय गिराम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. उमेश घोलप, प्रा. प्रसाद कुलकर्णी आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.